Thursday, June 30, 2011

सरकारी बाबूची चलाखी

माहितीचा अधिकार हा भारतीय स्वातंत्र्यातील मैलाचा दगड आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून हा कायदा सर्वसामान्य नागरिकांच्या हातात पडला आणि सामान्यांच्या लुटीला काहीअंशी पायबंद घालता येणे शक्य झाले. या कायद्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला असे म्हणता येणार नाही; परंतु भ्रष्टाचार उघड होण्यास महत्वपूर्ण साहाय्य झाले. राज्य असो किंवा केंद्र सरकार त्यांच्या दरबारी गलेलठ्ठ वेतन देऊन पोसल्या जाणारी सरकारी बाबू ही खरे तर फारच गंमतीशीर जमात आहे. अलिकडे सरकारी नोकरी का हवी, याचे उत्तर या बाबूंच्या बाळसे धरलेल्या पोटांकडे आणि त्याच्याकडे असणार्‍या श्रीमंतीकडे पाहून मिळते. या बाबूंना भस्म्या रोग जडलेला असल्याने, खाबूगिरीत अडचणीचा ठरणारा माहितीचा अधिकार कायदा त्यांच्यासाठी नरड्यात अडकलेले हाडूक ठरला आहे. परंतु, या बाबूंच्या गतजन्मातील किंवा या जन्मातील पाप म्हणा, त्यांच्यासाठी हा कायदा राज्यात व केंद्रात लागू आहे. दंडात्मक कारवाईचा धाक या कायद्यात असल्याने सरकारी बाबूंना अनच्छेने का होईना या कायद्यासमोर लोटांगण घालावेच लागते आणि आपल्याच भ्रष्टाचाराचा कागद सर्वसामान्य माणसाला लिहून द्यावा लागतो. परंतु, म्हणतात ना, कायदा तेथे पळवाटा. त्याप्रमाणे या बाबूमंडळींनीही आता या कायद्याच्या पळवाटा धुंडाळून काढल्या असून, त्यातीलच एक चलाखी नेवासा तालुक्यातील तरवडी येथे चव्हाट्यावर आली. तरवडीच्या ग्रामसेवकाने लढवलेल्या शकलेबद्दल खरे तर त्याचा राष्ट्रपतींच्याहस्ते विशेष सन्मान करायला हवा आणि अशी हुशार माणसे राष्ट्रपतींनी त्यांच्या पदरी ठेवून घ्यायला हवी. तरवडीच्या ग्रामसेवकाला तेथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी गेल्या दहा वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. प्रारंभी या महाशयाने ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. प्रकरण गटविकास अधिकार्‍यांकडे अपिलात गेल्यावर त्याला नाईलाजाने का होईना ही माहिती द्यावी लागली. बरे माहिती दिली तर आपला भ्रष्टाचार उघड होईल, आणि आपण अडचणीत येऊ, या भीतीने या ग्रामसेवकाने शक्कल लढविली. मागितलेली माहिती इतक्या घाणेरड्या अक्षरात दिली, की नंतर त्यालाच ती वाचायला दिली तर वाचता येऊ नये. आप लिखे खुदा पढे या म्हणीप्रमाणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना ही माहिती देऊन नियमाप्रमाणे ग्रामसेवकाने सुटका करुन घेतली. मागितलेल्या माहितीची कागद पाहून मात्र या नागरिकांनी कपाळावर हात मारून घेतला. माहितीचा अधिकार कायदा बनविताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनासुद्धा अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल, असे वाटले नसावे. आता जनलोकपाल विधेयकाचे आंदोलन यशस्वी झाले, की अण्णांनी जरा या चलाखीकडेही पाहण्याची गरज आहे. मागितलेली माहिती स्वच्छ अक्षरात किंवा मुद्रीत करूनच दिली पाहिजेत, अशी या कायद्यात सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही तर तरवडीच्या ग्रामसेवकाचा कित्ता इतरही सरकारी बाबू गिरवत राहतील, आणि एक चांगला कायदा बासनात गुंडाळण्याची वेळ देशावर आलेली असेल.

Saturday, June 18, 2011

हो, देवाला रिटायर लागेल!!

देव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला; त्यांना इतरांना देव दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत धर्मगुरू ही व्यक्तीपूजक संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत देवाचे अस्तित्व कायमराहील. मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्याच्या कल्पनांना मर्यादा नाही, या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या त्याच्या बुद्धी, जिद्द आणि कार्यशक्तीलाही तोड नाही. अंधश्रद्धा ही जी सामाजिक कीड आहे ना, ती खरे तर देव या काल्पनिक पात्राने निर्माण केली आहे. जगात देव अस्तित्वात नाही, परंतु समाजातील काही आळशी आणि कर्तृत्वशून्य माणसांनीच त्याचा बागुलबुवा उभा केला. पुरोगामी चळवळीतील उर्ध्वयू आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीरामलागू म्हणतात त्याप्रमाणे, आता देवाला रिटायर केले पाहिजेत. त्यांच्या याच विचारांचा शुक्रवारी त्यांनी पुन्हा पुण्यात पुनरूच्चार केला. आता डॉक्टरांनी सांगितले आहे, की परमेश्‍वराचे अस्तित्व हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. त्यांचे हे म्हणणे पटत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत कामकरणार्‍या माझ्या मित्रांनी आता देवावरच हल्लाबोल केला पाहिजे, मूळावर घाव घातल्याखेरीज समाजाला लागलेली अंधश्रद्धेची कीड नष्ट करता येणे शक्य होणार नाही.

...

मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्यापैकी फारच कमी लोकांना स्वतःच्या सामर्थ्याची जाण झालेली असते. जे स्वतःला दुबळे, कमजोर समजतात तेच देवाला शरण जातात. वास्तविक पाहाता, देव नावाची कोणतीही शक्ती अस्तित्वात नसून, तो एक भ्रमआणि खूळ आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ अभिनेते व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील फार मोठे नाव डॉ. श्रीरामलागू यांनी पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्ङ्गीिींेींर्शे देण्यात येणार्‍या ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरणप्रसंगी जे वक्तव्य केले, ते म्हणूनच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. डॉ. लागू म्हणाले होते, की परमेश्वराचे अस्तित्व ही सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे. डोक्यात असणारे हे खूळ काढून टाकल्याशिवाय अंधश्रद्धेचे डोंगर हटविणे अशक्य आहे. अंनिसतर्ङ्गीिींेींर्शे यंदाचा ’सुधारक’कार पुरस्कार ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांना डॉ. लागू यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. विद्या बाळ यांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान मोठे आहे. परिवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे कामही चांगले आहे. या पुरस्काराच्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा खर्‍याअर्थाने गौरव झाला असे म्हणावे लागेल. या कार्यक्रमाला रजिया पटेल, अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमात डॉ. लागूंनी केलेले विवेंचन मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते म्हणाले होते, की धार्मिक आणि जातीय अस्मितेचे लढे तीव्र होत असताना, दुसरीकडे मात्र सामाजिक समतेचे लढे निष्पभ्र होत आहेत. भारतीय समाजात जातीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात असून, त्यासंदर्भातील लढे अधिक तीव्र होतात ही चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे, विवेकवादाचा पाया मजबूत करणे आवश्यक असताना, हा पाया ढिसाळ करण्याचे कामकाही माणसे हेतुपुरस्सर करत आहेत. आजची परिस्थिती काय आहे. भारतीय समाज एकीकडे वैज्ञानिक प्रगतीच्या यशोशिखरावर असताना, दुसरीकडे या समाजाची मती अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडायला तयार नाही. पूर्वीच्या शारीरिक अंधश्रद्धा आता बहुतांश लोकांनी त्यागल्या असल्या तरी नव्या स्वरुपात मानगुटीवर बसणार्‍या बौद्धिक अंधश्रद्धा पाहता, आमचे आजही अंधश्रद्धेचे ग्रहण सुटले नाही, हा विचार व्युत्पन्न होतो. अंगारे, धुपारे घेणे हे आमची वैज्ञानिक बुद्धी, अंधश्रद्धा आहे असे म्हणते. परंतु, क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर गळ्यातील लॉकेटमध्ये गणपती आणि सत्यसाई बाबा यांची छायाचित्रे मिरवतो, तेव्हा सुज्ञ माणसेही या दोन छायाचित्रांतील संकल्पनेच्या आहारी जाण्याची प्रेरणा घेत असतात. या समाजात संत आणि चमत्कारी पुरुष नेहमीच सामान्य माणसांवर प्रभाव टाकत आले आहेत. या संत किंवा बाबा मंडळींनी कधीही देवाचे अस्तित्व नाकारले नाही. उलटपक्षी देवाचे स्तोममाजविण्यात या मंडळींनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. या मंडळींनीच समाजावर अंधश्रद्धेचा पगडा बसविण्याचे पाप केले. समाजातील धर्मगुरू किंवा हिंदू समाजात ज्यांना भूदेव म्हणून ओळखले जाते त्या मंडळींवर भलेही काही संतांनी शाब्दिक प्रहार केले असतील, परंतु देवाचे अस्तित्व कायमठेवून झालेले हे प्रकार म्हणजे पाण्यावर ओढलेल्या रेघोट्याच होते. काही संतांनी अंधश्रद्ध बाबींवर भलेही त्यांच्या अभंगांतून टीकेचे आसूड ओढले असतील. परंतु, अंधश्रद्धेचा पाया ज्या देव या संकल्पनेवर उभा राहिला आहे, त्या देवाचे खूळ डोक्यातून बाहेर काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. एक मंदीर बांधले तर भूदेवांच्या वंशातील दहा-पंधरा लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होते. म्हणून, देव टिकला पाहिजेत, देव जगला पाहिजेत हा काही लोकांचा अट्टहास असतो. हा अट्टहास सामान्य माणसे समजून घेत नाही. भूदेव म्हणणार्‍या मंडळींच्या पोटापाण्यासाठी देव ही संकल्पना प्रारंभी पुढे आली, दुर्देवाने आज ती भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ हिंदू धर्मातच ही संकल्पना आहे, असे म्हणता येणार नाही. सर्वच धर्मात ती अस्तित्वात आहे. जेथे धर्मगुरु असतो, तेथे देव असतो. कारण देव नसतील तर धर्मगुरुंची पोटे भरणार तरी कशी? फारपूर्वी डॉ. श्रीरामलागू यांनी आता देवाला रिटायर करा, अशी मागणी केली होती. पुरोगामी चळवळीतील आणखी एक उर्ध्वयू दिवंगत निळू फुले यांनीदेखील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामकरताना, देवामुळे अंधश्रद्धेला बळकटी मिळते, ही बाब मान्य केली होती. देवाला रिटायर करण्याची प्रक्रिया आवश्यक असली तरी ती वेळखाऊ आहे. नवी पिढी विज्ञाननिष्ठ निपजेल आणि तिचा स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास बसेल, तेव्हा ती देवाच्या खुळातून स्वतःला मुक्त करुन घेईल. तोपर्यंत देवाच्या रिटायरमेण्टवर प्रश्‍नचिन्हच आहे. देवाच्याविरोधात बोललेले फारसे कुणाला पचनी पडत नाही. कारण आज प्रत्येक जण हा या संकल्पनेच्या विविध माध्यमांतून आहारी गेला आहे. एकप्रकारची बौद्धिक गुलास्वतःहून स्विकारण्यात आली आहे. परंतु, सुजाण मानवी समाजनिर्मितीसाठी देव रिटायर करणे ही अत्यावश्यक बाब आहे. मानव हा त्याच्या बुद्धीचा फार कमी वापर करतो, असे भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे जनक डॉ. एपीजे अब्दुल कलामयांनी सांगितले होते. मानव जेव्हा पूर्ण क्षमतेने बुद्धीचा वापर करण्यास शिकेल, तेव्हा निश्‍चितच प्रत्येकाच्या डोक्यातून देवाचे खूळ निघालेले असेल. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड मेंदू पोखरण्याचे कामकरते. एकदा मेंदू पोखरला, की कुटुंब आणि समाज पोखरण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते. पूर्वीचेच अंधश्रद्धाळू आता आमची देवावर डोळस श्रद्धा आहे, असे म्हणू लागल्याचे दुर्देवी चित्र समाजात दिसते. देव हा कधीही अस्तित्वात नव्हता. कोणीही तो अनुभवला नाही आणि पाहिलाही नाही. ज्यांनी देव पाहिला असा दावा केला असेल, त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. देव असेलच ना तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, गरिबी, दुःखी, पीडित माणसांच्या रुपात तो असेल. त्याची सेवा हीच ईश्‍वरसेवा, अशी विवेकानंदांना अपेक्षित असलेली कृतीशील ईश्‍वरनिष्ठा आता पुढे आली पाहिजेत. परंतु, आम्ही एखाद्या शेंदूर फासलेल्या दगडाला नैवेद्य अर्पण करतो, आणि दारी आलेल्या भिकार्‍याला पुढच्या दारी जा म्हणून सांगतो. जीव भावे शिव सेवा हा स्वामी विवेकानंदांचा देव असेल तर हा देव समाजाने का स्वीकारला नाही? दगडांतील आणि मूर्तीतील देव आमच्या मानगुटीवर अद्यापही बसलेला कसा? या प्रश्‍नांची उत्तरे समाजाच्या मानगुटीवर देव बसविणार्‍यांनी देण्याची गरज आहे. खरे तर वैज्ञानिक प्रगती ही मानवी सामर्थ्याचे दृष्य प्रगटीकरण आहे. आकाशगंगेतील बहुतांश ग्रहांचा वेध घेतलेल्या माणसाला अद्याप स्वर्ग कुठे दिसला नाही. तो अस्तित्वात नसल्याने भविष्यातील अनेक अवकाश मोहिमांतूनही तो दिसणार नाही. परंतु, मेल्यानंतर तुला स्वर्ग पाहिजे असेल तर आता मला दान दे, असे सांगणार्‍या भामट्यांनी हा स्वर्ग कधीही समाजाच्या मेंदूतून बाहेर पडू दिला नाही. जीवंतपणी दान देता देता भुकेकंगाल होऊन मरणारा माणूस तो स्वर्गात गेला का हे सांगू शकत नाही, हेच येथील काही भूदेवांच्या पथ्यावर पडत आले आहे. मानवी मेंदूच्या कल्पकतेतून संगणकाचा जन्मझाला, त्याने मेंदूची गतीशिलता वाढविली. परंतु, घरी संगणक आणल्यावर जोपर्यंत आपण त्याची पूजा करत बसू, तोपर्यंत आमच्या या मेंदूच्या अज्ञानाची किव करावी लागणार आहे. देवाचे अस्तित्व नाकारणार्‍याला नास्तिक म्हणून हीनवायचे आणि त्याच्या अंगावर दगडे फेकायची ही येथील समाजाची मानसिकता काहींनी निर्माण करून दिली आहे. ही मानसिकता आता बदलावी लागेल. सहाव्या शतकात जेव्हा पायथागोरस हा पृथ्वी गोल आहे, हे सांगत होता; तेव्हा सर्वच धर्ममार्तंडांनी आणि तत्कालिन समाजाने त्याला मुर्खात काढले होते; त्याचे जीवन जगणे अवघड केले होते. परंतु, आज आपण सर्वच पृथ्वी गोल असल्याचे वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध करत आहोत. तीच परिस्थिती आज डॉ. श्रीरामलागू यांच्याबाबतीत लागू होते. देवाला रिटायर करा किंवा, डोक्यातून देवाचे खुळ काढा असे सागणारे डॉ. लागू आज भलेही समाजाला द्रुष्ट वाटत असतील. परंतु, भविष्यात देवाचे खुळ डोक्यातून काढलेली पिढी निश्‍चितच जन्माला आलेली असेल, हा विश्‍वास ठेवू या!

Sunday, June 12, 2011

बाबांचे नापाक इरादे

...
भारतात सध्या माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी सशस्त्र धुमाकूळ घातला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आपण लढत आहोत, असे ही मंडळी सांगतात. गेल्या कित्येक दशकांपासून त्यांचा रक्तपात सुरु असून, आपलीच माणसे ही मंडळी मारत आहेत. दुसरीकडे, सामाजिक परिवर्तनाची गरज म्हणून योगगुरु रामदेव बाबांनी सशस्त्र दल उभारण्याची घोषणा केली आहे. बाबांकडे ११०० कोटी रुपयांचा पैसा आहे. अशाप्रकारचे मूलतत्ववादी दल ते उभारू शकतात. परंतु, त्याचे सामाजिक परिणाम काय होतील, याचा विचार बाबांनी केला आहे का? सरकार ऐकत नाही म्हणून सेना उभारण्याच्या बाबांच्या विचारांना कुणीही पाठिंबा दिला नाही. या देशात राष्ट्रपित्याने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र सामान्य माणसांच्या हाती दिले आहे. ते शस्त्र म्हणजे अहिंसा. अण्णा हजारे हेच शस्त्र घेऊन सरकारविरुद्ध लढतात आणि त्यात कोणतेही सरकार पराभूत होते. रामदेव बाबा मात्र हे शस्त्र हाती घेऊन पराजित का झाले, याचा विचार त्यांनी करावा. अहिंसेचे आयुध वापरणारा शुद्ध चारित्र्याचा असावा लागतो, तेव्हा आंदोलन यशस्वी होते. रामदेव बाबा नेमके येथेच कमी पडले आहेत.
...

पोलिसी दमनाच्याविरुद्ध बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक तथा देशाचे दुसरे गांधी अण्णा हजारे यांनी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनानंतर हजारे यांनी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मूदत दिली असून, अन्यथा स्वातंत्र्याची दुसरी लढाई अहिंसेचे शस्त्र हाती घेऊन लढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई व विदेशात दडविलेला ४०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात परत आणण्यात यावा, या मागणीसाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी आमरण उपोषण सुरुच ठेवले असून, आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. बाबांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने यापूर्वीच मान्य केलेल्या आहेत. या सर्व उपोषणांवरून उन्हाळ्याच्या दिवसांत बातम्यांचा दुष्काळ भोगणार्‍या मीडियाला चांगल्या स्टोरीज मिळाल्या असून, रात्रंदिवस वृत्तवाहिनी चालविण्यासाठी चांगळे दळण दळायला मिळाले आहे. आपल्या उपोषणादरम्यान रामदेव बाबांनी ११ हजार युवकांचे सशस्त्र संघटन उभे करण्याची घोषणा केली, या घोषणेने आता राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. बाबांवर पोलिसी अत्याचार झाला म्हणून, बाबा या देशात सशस्त्र दल तयार करत आहेत, तर दुसरीकडे या देशातील माओवादी किंवा नक्षलवादीदेखील सशस्त्र लढा देत, आपल्याच सरकारी यंत्रणांच्या मुळावर उठले आहेत. या लोकांचादेखील अत्याचाराला विरोध व समतेचे राज्य आणण्यासाठी संघर्ष सुरु असल्याचे ते सांगत असतात. बाबा सशस्त्र दल उभारून या देशात यादवी निर्माण करण्याचे षडयंत्र तर रचत नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रामदेव बाबांच्या या विचारांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हजारे हे गांधीवादी असून, अहिंसा हेच सर्वात मोठे शस्त्र असल्याचा त्यांचा विश्‍वास आहे. रामदेव बाबांचे उपोषण हे आता खरे तर संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. बाबा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचा मुद्दा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांना चव्हाट्यावर आणला होता. तमिळनाडूमध्ये झालेल्या संघाच्या एका बैठकीत बाबांच्या आंदोलनाचा कट शिजला होता, असा खुलासाही चिदंबरम् यांनी केला आहे. योग ते राजकारण हा जो प्रवास रामदेव बाबा करत आहेत, त्या अनुषंगाने अनेक बाबी बाबांविषयी आता संशय निर्माण करतात. राजकीय स्थिरतेसाठी काळा पैसा हा एक चांगला मुद्दा बाबांनी हाती घेतला असला तरी वेळोवेळी राजकीय पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे बाबा हा मुद्दा त्यांच्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरूनदेखील उपस्थित करू शकले असते. एकीकडे, केंद्र सरकारने बाबांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या असताना आता ते उपोषण का करत आहेत, हादेखील मोठा मुद्दा सामोरे येतो. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध जर त्यांचे हे उपोषण असेल तर तसे ते का सांगत नाहीत, त्यामुळे समाजजीवनदेखील त्यांच्या गूढ भूमिकांमुळे त्यांच्यावर नाराज झाले आहे. हजारे यांनी बाबांच्या समर्थनार्थ राजघाटावर उपोषण करताना शुद्धचारित्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बाबांच्या चारित्र्याबाबत मात्र अनेक बाबी वादग्रस्त आहेत. बाबांकडे फार कमी काळात ११०० कोटी रुपयांची संपत्ती एकवटली असून, त्यांचा अतिनिकटवर्तीय सहकारी आचार्य बाळकृष्णन् हा नेपाळी गुन्हेगार निघाला आहे. विदेशात असलेले कोट्यवधींचे बेट त्यांना भेट मिळाल्याचे ते सांगतात खरे परंतु, याबाबतदेखील वेगवेगळी चर्चा ऐकावयास मिळते. एकंदरित हजारो कोटींचा हा स्वामी शुद्धचारित्र्याचा म्हणून फार कमी लोकं स्वीकारायला तयार आहे. हजारे यांनी अत्यंत गर्वाने सांगितले होते, की त्यांच्याकडे एक खाली थैली आणि झोपन्यासाठी अंथरुण सोडले तर काहीही नाही, अशी भूमिका रामदेव बाबा सार्वजनिकरित्या घेऊ शकतात का? या देशातील सुरक्षा यंत्रणा समाजहिती असताना रामदेव बाबा दुसरी सशस्त्र सेना तयार करण्याचे घाटत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्याची गरज म्हणून अशाप्रकारची सशस्त्र सेना उभारली होती. परकीय इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्याकाळी ती अत्यावश्यक बाब होती. आता अशाप्रकारची कोणतीही गरज नसताना या देशात यादवी निर्माण करण्यासाठी बाबा हा उपद्व्याप का करत आहेत? राष्ट्रपिता महात्मा गांधींचे अहिंसा हे शस्त्र घेऊन लढणारे अण्णा हजारे आत्मक्लेश करून त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊ शकतात, कोणतेही सरकार त्यांच्या पुढे झकत आले आणि यापुढेही झुकणारच आहे. त्यासाठी त्यांना सेना उभी करण्याची गरज वाटत नाही. हजारे यांच्यासारखे शुद्धचारित्र्य रामदेव बाबा कमाविणार नसतील, तर अशा कितीही सेना त्यांचे इप्सित साध्य करून देणार नाही, हे बाबांनी लक्षात घेण्याची गरज आहे.